Netbhet Emagzine November 2009 (25)

  • June 2020
  • PDF

This document was uploaded by user and they confirmed that they have the permission to share it. If you are author or own the copyright of this book, please report to us by using this DMCA report form. Report DMCA


Overview

Download & View Netbhet Emagzine November 2009 (25) as PDF for free.

More details

  • Words: 929
  • Pages: 3
Netbhet eMagzine | November 2009

एक आगळी-वेगळी पैज पैज ह्या पर्कारापासून मी जरा चार हात दूरच राहतो. कारण त्यात हरलो तर फार मोठे काही तरी गमवावे लागते आिण िजंकावे म्हणाले तर ते म्हणावे िततके सोपे नसते. पण शेवटी मानव पर्ाणी हा चुका करतच राहतो नाही का? अशीच एक घटना, कॉलेजच्या िदवसातील. ं नेहमीपर्माणे आम्ही सगळे टवाळकीगीरी करत कॅ िन्टन मध्ये बसलो होतो. रोज पैसे फार खचर् होतात म्हणून कॅ िन्टन मध्ये जायचे नाही असे ठरवायचो.. आिण दररोज पावलं ितकडेच वळायची. सहज मनात िवचार आला.. आठवडाभर रोज कॅ िन्टनमध्ये येऊन खायचे आिण पैसे दुसऱ्या कु णी तरी भरायचे असे घडले तर िकती बरे होईल नाही?. मी माझा िवचार तसा लगेच बोलूनही दाखवला. आमच्या गप्पा चालूच होत्या तेवढ्यात कॅ िन्टन मध्ये दोन छोटी मुलं पैसे मागायला आली. त्यानी ं हनुमानाचा वेष घातला होता. तोंडाला हनुमानाचा मुखवटा, गळ्यात माळा, कमरे ला एक फडक बाधले ं ले, खाद्यावर ं एक गदा, आिण मागे शेपटी. असली सॉिलड ध्यान िदसत होती ती. गर्ुपमधल्याच एकाला युक्ती सुचली, मला म्हणाला.. “चल.. तुझे आठवड्याचे िबल मी भरतो..पण एक पैज लावायची.. ती िजंकलास तरच..”. मी लगेच तयार झालो.. मग तो म्हणाला.. हे दोन हनुमान आहेत ना त्याना ं तुझ्या गाडीवर बसवायचे आिण डेक्क्नन पयर्ंत िफरून यायचे. बरं नुसते जायचे नाही..जाताना स्वतःशीच काहीतरी मोठ्यादा ं बडबडायचे. कु णी काही बोलले तरी त्याच्याशी ं काही बोलायचे नाही. तू बरोबर वागतो आहेस की नाही हे पाहायला आम्ही मागून आमच्या गाड्यावरून ं येणार.. बोल आहे कबूल?. माझे कॉलेज.. िसंबायोिसस.. सेनापती बापट रोडवर होते.. तेथून डेक्कन तसे फार लाब ं नाही. पण तरीही…!! िशवाय वाटेत दोन कॉलेज लागतात..B.M.C.C आिण मराठवाडा.. चागले ं public असते.. जवळच F.C. रोड आहे..काय करावे.. पण पैसे वाचण्याचा मोह ही होताच की.. शेवटी मी तयार झालो.. पैज लावली तर खरी, पण मनात िवचार-चकर् चालू होते. इतक्या वेळ बोलायचे तरी काय?. नुकतेच िशवाजी महाराजावरील ं पुस्तक वाचनात आले होते, त्यातील पावनिखंडीचा भाग कालपरवाचं वाचला असल्याने जसाच्या तसा लक्षात होता. मग ठरले तर.. तोच इितहास बडबडायचा. ते दोन वानर पोरही माझ्याबरोबर पािकर्ं ग मध्ये आली. आधी दोघानाही ं मागे बसवले.. पण पुढच्याची शेपटी मागच्याच्या तोंडात जात होती.. त्यामुळे तो मागचा वैतागला. शेवटी एकाला मागे बसवले, आिण दुसरा, पुढे पेटर्ोलच्या टाकीवर बसला. काय संुदर दृश्य होते ते. सगळे जण माझ्याकडे हा काय publicity stunt म्हणून बघत होती. हास्याचा महापूर लोटला. तशातच माझी गाडी मी पािकर्ं ग मधून बाहेर काढली…मी माझी बडबड लगेच मोठ्यादा ं चालू के ली.

www.netbhet.com | By Salil Chaudhary & Pranav Joshi

Netbhet eMagzine | November 2009

“….. आिण महाराजाची ं पालखी पन्हाळ्यावरून बाहेर पडली. अंधारामुळे िदसत काहीच नव्हते. पाऊस व सोसाट्याचे वादळ चालूच होते. िवजेच्या पर्काशात शतर्ूने पािहले (मनातल्या मनात म्हणाले, H.O.D. ने पािहले तर) तर या िभतीने जीव खालीवर होत होता. महाराज शर्ींचे स्मरण करीत होते जगदंब-जगदंब!..सबंध डोंगरावरून पाणी खळाळत होते. रातिकड्यानी ं ककर् श सूर धरला होता. सारे वातावरण भयानक होते…” ( वातावरण खरं च भयानक होते ते.. पुढे वानर, मागे वानर अशी ती आमची फे री सेनापती बापट रोड पासूनच कु तूहलाचा आिण हास्याचा िवषय ठरली होती. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका छोट्या मुलीने तीच्या आईला आमच्या कडे बोट दाखवून म्हणाली..”ममा ममा ते बघ मंकी गाडीवरून चाललेत” मागोमाग माझी दोस्त मंडळी येतच होती. रं गोली हॉटेलपाशी नेमका िसग्नल लागला. आता आली का पंचाईत. कारण गाडी थाबवू ं न बोलणे म्हणजे फारच झाले. आजूबाजूला लोक उभी असणार.. पण काय करणार.. पैज लावली होती.. माझे िशवचिरतर् चालूच होते) ….बाजीपर्भंूनी आिण मावळ्यानी ं वेढ्यात ं पाऊल टाकले. पावसाचे आडवेितडवे फटकारे बसत होते. महाराजाची ं पालखी गुपचूप पण झपझप पुढे सरकत होती. थोड्याच वेळात वेढ्याची हद्द संपली. महाराज िसद्दी जौहरच्या मगरिमठींतुन सहीसलामत िनसटले होते. (शेजारचा एक माणूस बऱ्याच वेळ आमच्याकडे बघत होता, शेवटी त्याने िवचारले..) कु ठल्या कॉलेजचा Traditional Day? (मला इतराशी ं बोलण्याची परवानगी नव्हती. मी त्याच्याकडे नजर टाकली आिण म्हणालो..) “तुम फौरन िशवाजी का पीछा करो! मरे हाथोंसे एक बेनजीर नगीना िनकल गया! हमारी ऑंखों में धूल झोंककर िशवाजी भाग गया! जाओ! (तो माणूस चकर्ावून गेला. म्हणाला.. काय आज सकाळी सकाळीच का?) मी: बाजीपर्भू महाराजाना ं म्हणाले ” महाराज, तुम्ही जाणें! या िखंडीमेध्ये िनम्मे मावळे घेऊन मी थाबतो. ं गडावर जाताच ं तोफाचे ं आवाज करणे! तोंपावतो गिनमाची फौज येऊं देत नाही! आमची िचंताच करूं नका” बाजींनी महाराजाना ं अखेरचा मुजरा के ला. हर हर महादेव! त्याच वेळेस िसग्नल सुटला.. बरोबरच्या वानर सेनेनेही खाद्यावरील ं गदा उं चावून “हर हर महादेव” चा जल्लोष के ला. शतर्ूची पिहली भयंकर लाट िखंडीवर थडकली. (माझ्या आजूबाजूनेही गदीर्ची पर्चंड लाट वाहत होती. सगळ्याच्या ं नजरापासून तोंड लपवत मी गाडी हाकत होतो) बाजीची (आिण माझीही) वानरसेना खवळली होती. खडाजंगी युद्ध सुरू झाले. बाजीची फौज िसद्दी मसूदच्या फौजेला जणू आव्हानच देत होती या या लेकानो! ं आमचा राजा हवाय नाही का तुम्हाला? ं या इकडे!

www.netbhet.com | By Salil Chaudhary & Pranav Joshi

Netbhet eMagzine | November 2009

थोड्याच वेळात डेक्कन आले.. चला..एक तर टप्पा पार झाला.. आता परत वळायचे आिण कॉलेज गाठले की झाली पैज पूणर्. पण बहुदा जगदंबेला.. आपले.. ईश्वराला हे मान्य नसावे. डेक्कन च्या बस स्टॉप वर अजून एक-दोन हनुमानाच्या वेषातील ती िभकारी पोर उभी होती. कोणता तरी एक नेता त्याना ं खाण्याचे काहीतरी वाटत होता. त्यातील एकाची नजर गाडीवर बसलेल्या त्या दोघाकडे ं गेली.. आिण त्याने आवाज टाकला.. “ए sss शंत्या, बबन्या.. अरं हे बघ इकडे काय िमळतेय” त्याना ं बघताच या पोरानी ं मला गाडी थाबवायला ं सािगतली ं आिण ट्णा..ट्ण उड्या मारत ही पोर ितकडे िनघून गेली. मी बऱ्याच वेळ वाट पािहली..पण गदीर्त ती पोर कु ठे पसार झाली काही कळलेच नाही. “….गडावर तोफा कडाडल्या, आिण एकडे बाजीचा देह िखंडीत कोसळला.. गजापूरची िखंड पावन झाली ! पावनिखंड !” माझ्या दोस्त लोकानी ं माझ्या performance ची कदर करून आठवड्याचे नाही.. िनदान ३ िदवसाचे ं कॅ िन्टन िबल भरले. अशी ही आगळी-वेगळी.. आिण खूप मजा के लेली पैज मी कधीच िवसरू शकणार नाही..

www.netbhet.com | By Salil Chaudhary & Pranav Joshi

Related Documents